Abdul Kalam  esakal
देश

अब्दुल कलामांना व्हायचे होते पायलट, मात्र बनले राॅकेट अभियंता

माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे.

गणेश पिटेकर

औरंगाबाद - माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. ते भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तमिळनाडूतील (Vachan prerna diwas) रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला होता. मुलांने कलेक्टर व्हावे अशी इच्छा कलामांच्या वडिलांची होती. याबाबत ते 'अग्निपंख' या (राजहंस प्रकाशन) आपल्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत म्हणतात, की माझ्या इच्छेप्रमाणे मी पायलट बनू शकलो नाही किंवा वडिलांच्या इच्छेनुसार कलेक्टर न बनता मी राॅकेट अभियंता बनलो, हे सांगणे मला महत्त्वाचे, संयुक्तिक वाटते. अब्दुल कलाम यांच्या केंद्रस्थानी भारतातला तरुण वर्ग होता. त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व वयोगटातील लोक उपस्थित असतं. कलामांवर जलालुद्दीन आणि शमसुद्दीन या दोघांचा प्रभाव होता. मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला, त्याने मी स्वतंत्र, वेगळा असा बनत गेलो. मोठेपणी मी त्या सर्वांपेक्षा वेगळा झालो, याची बीजे त्या दोघांच्या सहवासामुळे जो परिणाम झाला त्यामध्ये आहेत. (Abdul kalam birth anniversary)

शाळेत शिकायला न मिळणारे उपजत शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरुन दुसऱ्याच्या मनातले ओळखायला शिकलो, शरीराची, डोळ्यांची भाषा शिकलो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्त्रोत उगम पावत, फुलत, खळाळत गेला; त्याचे श्रेय मी निःसंशय त्या दोघांच्या सहवासाच्या माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो, असे अब्दुल कलाम यांनी 'अग्निपंख'मध्ये सांगितले आहे. कलामांना 'लोकांचा राष्ट्रपती' म्हणून संबोधले जाते. त्यांना १९९७ मध्ये भारतातील सर्वोच्च असे भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT