Abdullah Azam Khan Sakal
देश

Abdullah Azam Khan : आझम खान यांना आणखी एक मोठा धक्का, मुलाचे विधानसभेचे सदस्यत्वही रद्द

यूपी विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Abdullah Azam Khan : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचेही विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

यूपी विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली आहे. मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने सोमवारी सपाचे सरचिटणीस आझम खान आणि त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्ला आझम यांना १५ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोघांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अब्दुल्ला आझम खान रामपूरच्या सुआर मतदारसंघातून आमदार होते. मात्र, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवले जाते.

तर, तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर सहा वर्षे अपात्रता कायम राहते. आझम खान यांचे ऑक्टोबर 2022 मध्ये विधानसभेचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आले होते. त्यानंतर आता आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान याचे विधानसभेचे सदसत्त्व रद्द करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT