Abhinandan Varthaman  Team eSakal
देश

बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांची बढती

अभिनंदन वर्धमान हे हवाई दलात विंग कमांडर पदावर होते.

सुधीर काकडे

भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना हवाई दलाकडून ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली आहे. बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान पाकीस्तानशी झालेल्या संघर्षात भारतीय हवाई हद्दीच संरक्षण करताना अभिनंदन यांचं मिग -21 हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले होते. अभिनंदन हे श्रीनगरच्या 51 स्क्वॉड्रनचा भाग असताना 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी त्यांनी मिग-21 विमानासह उड्डाण घेतले होते. यावेळी त्यांचं विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये पडलं होतं.

पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडणाऱ्या अभिनंदन यांना शौर्यचक्र पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अभिनंदन यांना भारतीय वायुदलाकडून ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली असून लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. ग्रुप कॅप्टन पद भारतीय सैन्यातील कर्नलच्या बरोबरीचं पद आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलेल्या अभिनंदन यांना सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराला त्यांची सुटका करणे भाग पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT