देश

तपास संस्थांकडून अभिनंदन यांचे 'डिब्रिफिंग'

पीटीआय

नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याकडून आज तपास संस्थांनी पाकिस्तानमधील घटनांबाबत सविस्तर माहिती (डिब्रिफिंग) घेतली. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अभिनंदन यांची भेट घेतली.

पाकिस्तानातून परत आल्यानंतर अभिनंदन यांच्या कालपासून (ता. 2) दिल्लीतील लष्करी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांदरम्यान त्यांच्या शरीर आणि मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ते पाकिस्तानमध्ये असताना अभिनंदन यांना सामोरे जाव्या लागलेल्या घटनांबाबत सविस्तर माहिती तपास संस्था त्यांच्याकडून घेत आहेत. वैमानिक अभिनंदन हे पुन्हा लवकरच विमान उड्डाणास सज्ज होतील, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानी जेट विमानांबरोबरील हवाई युद्धात अभिनंदन यांचे मिग-21 विमान पडले होते. त्याआधी त्यांनी पाकिस्तानच्या एफ-16 विमानाला पाडले होते. जवळपास तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने भारताकडे सोपविले होते. या तीन दिवसांत आपला मानसिक छळ झाल्याचे अभिनंदन यांनी सांगितले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT