Pooja Khedkar  sakal
देश

Pooja Khedkar : आरोपाने काही फरक पडत नाही...दिव्यांगांच्या कोट्यातून आयएएस झालेले अभिषेक सिंह कोण आहेत ?

महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरनंतर आता आणखी एक अधिकारी अभिषेक सिंह वादात सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरनंतर आता आणखी एक अधिकारी अभिषेक सिंह वादात सापडले आहेत. अभिषेक सिंह यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करत आयएएसची नोकरी मिळविल्याचा आरोप केला जात आहे. त्यांची दिव्यांगांच्या कोट्यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अभिषेक २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असले तरी त्यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये पदाचा राजीनामा दिलेला आहे.

्अभिषेक सिंह यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची दिव्यांग श्रेणीतून परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजेच स्वत:हून चालण्यास फिरण्यास सक्षम नसल्याचे म्हटले होते. मागच्या वर्षी अभिषेक यांनी कला क्षेत्रात करियर करण्यासाठी आयएएस पदाचा राजीनामा दिला. अभिषेक यांचे जिम वर्कआऊट आणि नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे दिव्यांग श्रेणीतील त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतले जात आहेत.

मात्र आपल्याविरुद्ध खोटा प्रचार सुरू असल्याचा दावा अभिषेक सिंह यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अनेक युजर्सनी पीडब्लूबीडी-३ (पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी) च्या श्रेणीतील निकषाचा संदर्भ देत त्यांच्या पात्रतेवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. यात सेरेब्रल पाल्सी, कुष्टरोगाने बरे झालेला उमेदवार, बुटकेपणा, ॲसिड ॲटक पीडित, मस्कुलर डिस्ट्रॉफी आणि चालण्यात अडथळे येणे यासारख्या आजारांचा या श्रेणीत समावेश आहे.

नृत्य करणारे अभिषेक यांनी लोकोमोटर डिसॲबिलिटी श्रेणीनुसार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. अभिषेक सिंह यांनी या आरोपावर उत्तर देताना एक्सवर म्हटले, मला या आरोपाने काही फरक पडत नाही. मी आयुष्यात पहिल्यांदाच आरोपांना उत्तर देत आहेत. माझे वडील आयपीएस अधिकारी असल्याने मला फायदा मिळाला होता. माझे वडील अत्यंत गरिबीतून पीपीएस अधिकारी झाले आणि नंतर आयपीएसवर बढती मिळाली. आमच्या संपूर्ण कुटुंबात मी एकमेव आयएएस अधिकारी म्हणून निवडलो गेलो, असे ते म्हणाले. माझ्याविरुद्धचा बनावट प्रचार थांबवावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT