about rising suicide cases neet jee student kota parents move to kota with children esakal
देश

Kota News : पालकांचा आजी-आजोबांसह कोट्यात मुक्काम; मुलांनी टोकाचे पाऊल न उचलण्यासाठी दक्षता

वाढत्या आत्महत्यांमुळे चिंतित; आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कोटा (राजस्थान) : ‘नीट’, ‘जेईई’ सारख्या वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे, कोटात आपल्या मुलांना पाठविणाऱ्या पालकांची चिंताही वाढत आहे. आपल्या मुलामुलींनी टोकाचे पाऊल उचलू नये, म्हणून त्यांच्या अनेक पालकांनी आजीआजोबांसह कोटामध्ये स्थलांतर करण्याचा पर्याय निवडला आहे.

यावर्षी कोटात आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून नुकत्याच काही तासांच्या अंतराने दोन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तणावातून जीवनयात्रा संपविली. अत्यंत व्यग्र वेळापत्रक, गळेकापू स्पर्धा, सातत्याने चांगल्या कामगिरीचे दडपण,

पालकांच्या अपेक्षा आदींमुळे किशोरवयातच मुले मृत्यूला कवटाळत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे आता पालक मुलांना वसतिगृहात ठेवण्यास तयार नाहीत. त्याऐवजी कोटामध्ये भाड्याने घर घेऊन ते स्वत: मुलांसह राहणे पसंत करत आहेत.

चंडीगडमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शिवानी जैन यांनीही सुटी घेऊन कोटात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीसह राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पती पाच वर्षांच्या मुलासह चंडीगडमध्ये आहेत. त्या म्हणाल्या, की सध्या शिवानी अकरावीत असून बारावी झाल्यानंतर ‘नीट’ परीक्षा होईपर्यंत मी कोटात तिच्यासोबत राहण्याचे ठरविले आहे.

तिला वसतिगृहात ठेवल्यास आम्ही घरात शांततेत राहू शकणार नाही. अनेक वेळा मुले त्यांच्या तणावाबद्दल घरी दूरध्वनी करून सांगण्यास कचरतात. मात्र, जर पालकच इथे त्यांच्यासोबत असतील तर ते मुलांच्या वर्तनातील बदल लगेच ओळखू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

बिहारमधील सीतामढी येथील नीरूदेवी वयाच्या ८० व्या वर्षी आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या नातवासह कोटात स्थलांतरित झाल्या आहेत. नातवाला कोटात एकट्याने पाठवून आम्हाला घरी शांतता मिळाली नसती, हे त्यांचे उद्‌गार येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना किती पराकोटीच्या तणावातून जावे लागते, हे दर्शवितात.

मी मुलासोबत कोटामध्ये राहत आहे. आता मला त्याची काळजी कमी वाटते. आपल्याला बोलण्यासाठी तसेच धीर, दिलासा देण्यासाठी आईवडील सोबत असल्याचीही त्याला कल्पना आहे. तो नुकताच आजारी पडला. मात्र, त्याची काळजी घेण्यासाठी मी होते. त्याने ‘जेईई’ उत्तीर्ण व्हावे, अशी माझी इच्छा असली तरी त्याला गमावू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे आम्ही धोका पत्करू शकत नाही.

- संध्या द्विवेदी, विद्यार्थ्याची आई

सर्वच पालक कोटामध्ये मुलांसोबत राहण्यासाठी येऊ शकणार नाहीत. मात्र, मुलांना सोडण्यासाठी आल्यानंतर त्यांनी वातावरण, ठिकाणाची ओळख होईपर्यंत तरी मुलाच्यासोबत कोटात सुरुवातीला महिनाभर तरी थांबायला हवे. विशेषत: पहिल्यांदाच पालकांपासून दूर राहणाऱ्या मुलांमुलींसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे.

- चंद्रशील ठाकूर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, कोटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT