shivraj singh chauhan kamalnath  
देश

Congress Vs BJP : काँग्रेस की भाजप? मध्य प्रदेशात कोणाला मिळेल मुख्यमंत्रीपद? वाचा सर्व्हे काय सांगतो

रोहित कणसे

मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूका होणार आहेत. तब्बल पाच महिने आधीपासून दोन्ही पक्षांकडून निवडणूकीची तयारी केली जात आहे. यादरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान लोकांमध्ये जाऊन केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री कमलानाथ आणि दिग्विजय यांनी प्रचार सुरू केला आहे.

काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघांवरती फोकस केल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस मागे जेथे पराभव पत्करावा लागला त्या जागांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. निवडणूकांच्या तयारीदरम्यान एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याबद्दल माहिती समोर आली आहे.

एबीपी-सी वोटर सर्व्हेनुसार शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ यांच्यात या निवडणूकीत थेट लढत पाहायला मिळेल. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ३७ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवराज यांना तर ३६ टक्के कमलनाथ यांना पसंती दिली आहे.

तसेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील भरपूर पाठिंबा मिळाला आहे. सिंधिया यांना १२ टक्केल लोक मुख्यमंत्री पाहू इच्छितात. याखेरीज माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना फक्त १ टक्के लोकं मुख्यमंत्री पदावर पाहू इच्छितात. या सर्व्हेमध्ये १७ हजार ११३ लोकांनी आपले मत नोंदवले आहे.

सर्व्हेमध्ये १४ टक्के लोकांनी यापैकी कोणालाही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाहीये. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत जनातेने काँग्रेसला सत्ता दिली होती. यानंतर काँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्रपदाची जबाबदारी दिली होती.

मात्र त्यांचा कार्यकाळ जास्त काळ चालू शकला नाही. २०२० मध्ये ज्योतिरादित्यासिंधिया यांनी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक आमदार देखील भाजपमध्ये गेले. यामुळे काँग्रेस सरकार पडलं. सिंधियांच्या गटातील आमदारांना सोबत घेऊन भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT