Abu Azmi  Sakal
देश

Abu Azmi: अबू आझमी 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर; देशभरात २०हून अधिक ठिकाणी छापेमारी

बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधी ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्यावर आता इन्कम टॅक्स विभागानं मोर्चा वळवला आहे. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधी ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे. (Abu Azmi on income tax department radar Raids at more than 20 locations across country)

हे ही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

कुलाब्यातील कमल मेंशन या इमारतीत इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. या ठिकाणी अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचं कार्यालय आहे. तर वाराणसीत विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या परिसरात छापेमारी झाली. आरोप करण्यात आला आहे की, अभा गुप्ताद्वारे कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुप देखील इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहे. इन्कम टॅक्स विभागानं हवाला ऑपरेटर्सकडे छापेमारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT