nilesh lanke 
देश

Nilesh Lanke: 'आय निलेश लंके, टेक ओथ...'; सुजय विखेंचं आव्हान स्वीकारलं अन् इंग्रजीमधून संसदेत घेतली शपथ

Nilesh Lanke took oath in English: भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारून लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली असल्याचं बोललं जात आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज संसदेमध्ये शपथ घेतली. यावेळी त्यांनी इंग्रजीमध्ये संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारून लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली असल्याचं बोललं जात आहे.

निलेश लंके यांच्या शिक्षकांवरून त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील यावरून त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली होती. याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी संसदेमध्ये इंग्रजीमधून शपथ घेतली. यावेळी संसदेतील उपस्थित खासदार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहात होते. काहींनी त्यांचे कौतुक केल्याचं देखील समजतं.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, निलेश लंके यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर त्यांनी आयटीआय केला आहे. काहीकाळ ते कंपनीमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी हॉटेल देखील सुरू केले होते. पण, त्यांचं यात मन रमलं नाही. त्यांनी हॉटेल बंद केलं आणि सामाजिक कार्य करण्यास सुरूवात केली. हंगा गावात त्यांच्यामागे मोठा जनाधार उभा राहिला. त्यांनी येथे ग्रामपंचायत जिंकली होती.

२४ जूनपासून १८ व्या लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि इतर कॅबिनट मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. २५ जून रोजी महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी निलेश लंकेंनी इंग्रजीतून पदाची शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'जय राम कृष्ण हरी' असं म्हणत लंकेनी आपल्या शपथेचा शेवट केला. यावेळी ओळखीच्या खासदारांनी 'व्वा' म्हणत त्यांना दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Mumbai News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा बांधकाम, महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रकार; प्रशासनाचे तत्काळ कारवाईचे आदेश

गोविंदाची तब्येत बिघडली? चेहऱ्यावर मास्क, पडलेला चेहरा अन्.... सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Gen Z आणि Gen Alpha तरुणांशी संवाद साधला

Khed Shivapur Road Block: खेड-शिवापूर येथील रस्ता रोकोचा फटका; नायगावमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

SCROLL FOR NEXT