accident news Ten people died car fell into valley police hospital uttarakhand  esakal
देश

Accident News : देवीच्या दर्शनासाठी जाताना काळाचा घाला; मोटार दरीत कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू

अपघातात मोटार चालकासह मोटारमधील सर्वांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिठोरागड : उत्तराखंडमधील मुनसियारी येथील दरीत गुरुवारी मोटार कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मोटारीतून प्रवास करणारे सर्व प्रवासी हे दिडीहाट येथील कोकीळा देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी निघाले होते.

गुरुवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान, या प्रवाशांना घेऊन जाणारी मोटार मुनसियारी येथील दरीत सुमारे सहाशे फूट खोल कोसळून अपघात झाला. या अपघातात मोटार चालकासह मोटारमधील सर्वांचा मृत्यू झाला. येथील स्थानिक आपत्ती निवारण पथकाने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.

मृतांची ओळख पटली असून मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मुनसियारी येथे बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्‍याने या रस्त्यावर चिखल होऊ रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळेच हा अपघात झाल्याची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT