Election Commissioner esakal
देश

Election Commissioner : नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नेमणूक नको

निवडणूक रोखे प्रकरणात याचिका दाखल करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी केंद्र सरकारने अलीकडेच नवा कायदा केला होता. या कायद्यानुसार आयुक्तांची नेमणूक करण्यास मनाई करावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. निवडणूक रोखे प्रकरणात याचिका दाखल करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

अरुण गोयल यांनी आयुक्तपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगात आता केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर चालू आठवड्यात आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने केलेल्या कायद्यानुसार आयुक्तांची नेमणूक केली जाऊ नये, असे जया ठाकूर यांनी याचिकेत म्हटले आहे.

आयुक्त नियुक्ती संदर्भातील याचिका प्रलंबित आहे. यासंदर्भात जानेवारी महिन्यात न्यायालयाने एक नोटीस देखील जारी केली होती. यादरम्यान अरुण गोयल यांनी आयुक्तपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. हा सर्व संदर्भ लक्षात घेता नव्या कायद्यानुसार आयुक्तांची नेमणूक केली जाऊ नये, असा युक्तिवाद ठाकूर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates: संसदेत १२ ऑगस्टला FCRA विधेयक मांडले जाण्याची शक्यता

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT