पोलिसांनी रविवारी संचलन करून स्थानिक नागरीकांशी संवाद साधला Sakal
देश

आरोपी इस्लामी संघटनेशी संबंधित

कानपूर दंगल : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; एसआयटीची स्थापना

सकाळ वृत्तसेवा

कानपूर - कानपूर दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी हयात झफर हाश्मी याच्याकडे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या जहाल इस्लामी संघटनेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्या व्हॉटसअॅप तसेच इन्स्टाग्राममधील संदेशांची छाननी केली असता कटाचे पुरावेही पोलिसांना सापडले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रे पीएफआयशी संलग्न असलेल्या चार संघटनांशी संबंधित आहेत. एसडीपीआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), सीएफआय (कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया), आरआयएफ (रिहॅब इंडिया फौंडेशन) तसेच एआयसीसी या संघटनांचा कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे. पीएफआयकडून या संघटनांना पूर्वीपासून पैसा पुरविला जात आहे. दरम्यान, कानपूर शहर पोलिस आयुक्त विजयसिंह मीना यांनी सांगितले की, रविवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. संशयित आरोपीची यंत्रणा उद््ध्वस्त करण्याची कामगिरी या पथकाकडे असेल. आणखी एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.

आरोपींकडून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरचे फुटेज नष्ट करण्याचा तसेच त्यात फेरफार करण्याचे प्रयत्नही झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्यांची गय केली जाणार नाही, असेही मीना यांनी नमूद केले. दगडफेक केलेल्यांची नावे शोधण्यात आली असून त्यांच्या छायाचित्रांची पोस्टर रविवारीच जारी केली जात आहेत. त्यांना हुडकून पकडण्यासाठी पोलिसांची मदतच करावी, असे आवाहनही पोस्टरद्वारे केले जाईल.

पोलिसांचे छापे

शहरातील शांततापूर्ण वातावरण बिघडविण्यास कारणीभूत असलेल्या इतर सहा संशयितांची नावे हाश्मीने पोलिसांकडे उघड केली. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके छापे टाकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महिलेचा स्कर्ट ओढणे आणि शिट्टी वाजवणे हा गुन्हाच...! मुंबईतील न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला सुनावली 'अशी' शिक्षा

Women’s World Cup Final : विश्वकप जिंकल्यास महिला क्रिकेटपटूंना मिळणार कोट्यवधींचं बक्षीस? नेमकी कुणी दिली ऑफर? वाचा...

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

त्याच्यावरून संस्कार नाही ठरत... रेणुका शहाणेंनी मांडलं मत; म्हणतात- काही जणी पदर घेतात पण इतक्या घाणेरड्या...

DMart Discount Offers : डीमार्टमध्ये सामान एवढं स्वस्त देणं मालकाला परवडतं कसं? डिस्काउंट ऑफरमागं आहे सिक्रेट..समोर आलं शॉकिंग कारण

SCROLL FOR NEXT