Crime_Woman_ 
देश

धक्कादायक! बलात्काराच्या आरोपात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पीडितेला जिवंत जाळले

सकाळन्यूजनेटवर्क

जयपूर- राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली जामीनावर सुटलेल्या आरोपीने पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पीडितेचे शरीर 70 टक्के भाजले आहे. महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महिला ब्यूटी पार्लर चालवते आणि ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या पतीपासून वेगळं राहते. पोलिसांनी आरोपी प्रदीप बिश्नोईला अटक केली आहे आणि चौकशी सुरु केली आहे. याशिवाय पोलिस घटनास्थळीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास करत आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसल्यानुसार, महिलेच्या घराबाहेर एक तरुण पळताना दिसत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आजीच्या घराबाहेर एक कॅमेरा आहे. यावर बाईकवर असणारे तरुण दिसत आहेत. दोन वर्षांपूर्वी प्रदीप बिश्नोईविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी प्रदीम जामीनावर बाहेर होता. गोलूवाला पोलिस स्टेशनचे ओमप्रकाश सुधार यांचं सांगितलं की, महिलेच्या आजीच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस प्रत्येक बाजूने प्रकरणाचा तपास करत आहेत. आजीने सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी प्रदीप बिश्नोई विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आजीने सांगितलं की, आरोपी घरात घुसला आणि पळून जाण्यासाठी त्याने गेट खुले ठेवले. महिलेचा भाऊ बाहेरच्या खोलीमध्ये झोपला होता. आरोपीने त्याच्या खोलीच्या गेटला दोरी बांधली होती. त्यामुळे भावाला गेट खोलता आले नाही. महिला ज्या खोलीमध्ये झोपली होती, त्या खोलीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात त्याने रॉकेल पसरवले. त्यानंतर त्याने पीडितेला आवाज देऊन बाहेर बोलावले. महिला बाहेर येतात त्याने रॉकेल टाकलेला कपडा पेटवला. यामुळे पीडित महिला 70 टक्के जळाली आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT