Couple 
देश

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून तरुणावर ऍसिड हल्ला; शेजारच्या तरुणीचं कृत्य 

सकाळवृत्तसेवा

उन्नाव - आजवर एकतर्फी प्रेमातून तरुणींवर ऍसिड हल्ला झाल्याच्या अनेक घटना देशभरात ऐकायला मिळाल्या आहेत. त्या घटनांवर आधारीत नुकताच छपाक हा सिनेमा रिलिज झाला होता. त्यातल्या दीपिका पदुकोनच्या कामाचं कौतुकही झालं. पण, हा छपाक सिनेमा एका बाजुला आणि उत्तर प्रदेशात घडलेली घटना एका बाजुला अशी परिस्थिती आहे. प्रेमप्रकरणावरून एका युवतीने युवकावर ऍसिड फेकल्याची घटना आज पहाटे तीनच्या सुमारास उन्नाव जिल्ह्यतील मौरवा येथील भवानीगंज येथे घडली. जखमी युवकास लखनौच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात आणि शेजारीच राहत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित यादव हा तरुण भवानीगंज येथे दूध डेअरीचा व्यवसाय करतो. या डेअरीच्याच समोर तायबा राहत होती. रोहित आणि तायबा हे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि अनेक महिन्यांपासून बोलत होते; परंतु आज पहाटे रोहित नेहमीप्रमाणे दूध डेअरीची साफसफाई करत असताना तिने पाठीमागून त्याच्या अंगावर ऍसिड फेकले. या घटनेची माहिती कळताच डायल 112 पथकातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. या दोघांत प्रेमप्रकरण होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच आरोपी युवतीचीदेखील चौकशी सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी भवानगिंग भागात बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT