Acid  Sakal
देश

Acid Attack On Girl : दिल्ली पुन्हा हादरली; बारावीच्या विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून हादरवणारी बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Acid Attack On Girl in Delhi : श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून हादरवणारी बातमी समोर आली आहे.

देशाच्या राजधानीत एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे सांगितले जात असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेवेळी पीडित मुलगी घटनेच्या वेळी तिच्या लहान बहिणीसोबत होती. त्यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीतील द्वारका मोड भागात घडली आहे.

हल्लेखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते असे सांगितले जात असून, जखमी मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT