jacqueline fernandez
jacqueline fernandez 
देश

देशाबाहेर जाऊ देऊ नये; EDच्या नोटीशीमुळे जॅकलीनला एअरपोर्टवरच अडवलं

सकाळ डिजिटल टीम

200 कोटी रुपयांची वसूली करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जेंव्हापासून जॅकलीन फर्नांडीसचं नाव समोर आलंय तेंव्हापासून तिच्या अडचणींमध्ये वाढच होताना दिसत आहे. आज रविवारी जॅकलीनला देशाबाहेर जाण्यापासून अडवण्यात आलं. जॅकलीन आपल्या एका शोसाठी परदेशी निघाली होती. मात्र, तिला अडवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ईडच्या लुकआऊट सर्क्यूलरमुळे जॅकलीनला एअरपोर्टवरच रोखण्यात आलं आहे. तिला भारत सोडण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश देऊन LOC (लूक आऊट सर्कुलर) जारी करण्यात आल्याचे कळत आहे.

अलिकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीने दावा केलाय की, सुकेशने जॅकलीनला कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट दिले आहेत. ईडीच्या सांगण्यानुसार, 2021 च्या जानेवारी महिन्यामध्ये सुकेश आणि जॅकलीनमध्ये बातचीत सुरु झ आली आणि तेंव्हापासूनच ते जवळ आले. यादरम्यान सुकेशने जॅकलीनला 10 कोटी रुपयांचे गिफ्ट्स दिले आहेत. यामध्ये ज्वेलरी, डायमंडसारख्या अनेक वस्तूंचा समावेस आहे. इतकंच नव्हे तर जॅकलीनला त्याने 36 लाखांच्या चार पर्शियन मांजरी आणि 52 लाखांच्या इतर वस्तूही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT