Rahul Gandhi and Gautam Adani Sakal
देश

Rahul Gandhi: ''भ्रष्टाचाराचं प्रतीक म्हणजे गौतम अदानी, त्यांचे चीनशी...'', राहुल गांधींची सडकून टीका

अदानी प्रकरणावरून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल शेळके

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने दिली आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक घरातील कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज दिली जाईल.

दुसरे वचन प्रत्येक महिलेला दरमहा 2000 रुपये दिले जातील. तिसरे आश्वासन म्हणजे दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ मोफत देण्यात येईल.

चौथी योजना अशी आहे की कर्नाटकातील प्रत्येक पदवीधराला 3000 रुपये आणि डिप्लोमाधारकाला 2 वर्षांसाठी दरमहा 1500 रुपये दिले जातील.

अदानी प्रकरणावरून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. राहुल म्हणाले की, ''पंतप्रधान, तुम्ही अदानीला हजारो कोटी रुपये देऊ शकत असाल तर आम्ही गरीब, महिला आणि तरुणांना पैसे देऊ शकतो.

तुम्ही अदानींना मनापासून मदत केली, आम्ही कर्नाटकच्या जनतेला मनापासून मदत करू. गौतम अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत.''

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मी संसदेत विचारले की अदानींच्या शेल कंपनीचे 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? त्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही.

सहसा विरोधक संसद थांबवतात पण पहिल्यांदाच सरकारच्या मंत्र्यांनी संसद थांबवली. मला संसदेतून काढून टाकून आणि घाबरवू असा भाजपचा विचार आहे.

मी त्यांना घाबरत नाही. मी पुन्हा सांगतो, पंतप्रधान, अदानीच्या शेल कंपनीतील हे 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत? याचे उत्तर मिळेपर्यंत मी थांबणार नाही.

मला अपात्र करा, तुरुंगात टाका, माझी हरकत नाही ते करा, असे ते म्हणाले. अदानीच्या डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत चीनचे संचालक बसले आहेत. त्यांच्या शेल कंपनीत चीनचा डायरेक्टर आहे. याबाबत कोणताही तपास सुरू नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT