देश

'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

सकाळ डिजिटल टीम

लंडन : भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं 'सीरम' हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. मात्र, 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. 'The Times' ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.

पुढे त्यांनी म्हटलंय की, हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा 'एक अतिरेकीपणा आहे' पुढे पुनावाला यांमी म्हटलंय की, यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे.

अलिकडेच गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे. सध्या जगभरात प्राधान्याचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे कोरोनाविरोधातील लढ्याचा! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूटला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अदर पुनावाला हे या कंपनीचे CEO आहेत. सध्या महत्त्वाच्या जागी आणि प्रकाशझोतात असणाऱ्या अदर पुनावाला यांच्या जीविताला धोका संभवू शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT