Administration to use special ICards for children during Prayagraj Kumbh Mela 2019
Administration to use special ICards for children during Prayagraj Kumbh Mela 2019 
देश

कुंभमेळ्यात लहान मुलं हरवू नयेत म्हणून काय केलंय?

वृत्तसंस्था

प्रयागराज : प्रयागराज येथील अर्धकुंभमेळ्याला जवळपास बारा कोटी नागरिक भेट देण्याची शक्‍यता असल्याने या प्रचंड आकाराच्या सोहळ्यात लहान मुले हरविण्याची दाट शक्‍यता आहे. ही शक्‍यता लक्षात घेऊनच चौदा वर्षांखालील मुलांना "रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन' टॅग उत्तर प्रदेश पोलिस देणार आहेत. यामुळे मुले हरविल्यास त्यांना शोधणे सोपे जाणार आहे. 

पोलिसांनी यासाठी व्होडाफोन कंपनीचे सहकार्य घेतले असून, एकूण चाळीस हजार टॅग तयार करण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या परिसरात सर्वत्र चौकशी केंद्र उभारले जाणार असून, त्या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे मुले हरविल्यास पालकांना पोलिसांशी संपर्क साधून मुलांना शोधणे सोपे जाणार आहे. सर्वत्र एलईडी स्क्रीनदेखील उभारले असून, त्याद्वारेही विविध माहिती नागरिकांसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

किन्नर आखाडा-जुना आखाडा 
कुंभमेळ्यातील उद्याच्या (ता. 15) पहिल्या शाही स्नानात सहभागी होण्यासाठी किन्नर आखाडा आज अधिकृतपणे जुना आखाडाला जाऊन मिळाला. किन्नर हा वेगळा आखाडा म्हणून कायम राहणार असून, केवळ शाही स्नानासाठी हे दोन आखाडे एक झाले आहेत, असे या आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्‍वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सांगितले. किन्नर आखाडा कुंभमेळ्यात प्रथमच सहभागी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT