UGC  sakal
देश

Indian University Admission : भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश; प्रस्तावाला ‘यूजीसी’चा हिरवा कंदील

अनेकांना वैयक्तिक आणि आरोग्याच्या कारणास्तव जुलै- ऑगस्टमध्ये प्रवेश घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळू शकेल.

पीटीआय

नवी दिल्ली - परकी विद्यापीठांच्या धर्तीवर आता भारतीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया राबविता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) प्रमुख जगदीशकुमार यांनी याबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दर्शविला आहे. ही प्रवेश साखळी २०२४- २५ या शैक्षणिक वर्षापासून जुलै- ऑगस्ट आणि जानेवारी- फेब्रुवारी अशी दोन टप्प्यांत राबविण्यात येईल.

जगदीशकुमार याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘भारतीय विद्यापीठांनी दोनवेळा प्रवेश प्रक्रिया राबविल्यास त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल. बऱ्याचदा मंडळांच्या निकालांना विलंब होतो. अनेकांना वैयक्तिक आणि आरोग्याच्या कारणास्तव जुलै- ऑगस्टमध्ये प्रवेश घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना यामुळे पुन्हा प्रवेशाची संधी मिळू शकेल.

विविध उद्योगसमूहांना देखील वर्षांतून दोनदा कॅम्पसमध्ये निवड प्रक्रिया राबविता येईल परिणामी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील.’ सध्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांत दरवर्षी जुलै- ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यामुळे सर्व उच्च शिक्षण संस्थांना जुलै ते ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्राचा अवलंब करावा लागतो. हे सत्र मे- जूनमध्ये संपते.

हे फायदे होणार

  • स्रोतांचे योग्य वितरण शक्य

  • विद्यापीठांच्या कामात सुसूत्रता

  • आंतरराष्ट्रीय भागीदारीस बळ

  • शैक्षणिक गुणवत्ता वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT