adr report 12 percent sitting mps of rajya sabha billionaires highest percentage from ap telangana politics Sakal
देश

ADR Report : राज्यसभेतील १२ टक्के खासदार अब्जाधीश; आंध्र प्रदेश, तेलंगणमधील सर्वाधिक सदस्य

२३३ निर्वाचित सदस्यांपैकी २२५ सदस्यांचे त्यांच्यावरील दाखल गुन्हेगारी खटले व सांपत्तिक स्थिती या संदर्भात विश्लेषण करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यसभेच्या विद्यमान खासदारांपैकी १२ टक्के सदस्य अब्जाधीश असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केलेल्या विश्लेषणातून पुढे आली आहे. यामध्ये दक्षिणेतील आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील सदस्या आघाडीवर असल्याची बाबही समोर आली आहे.

‘एडीआर’बरोबरच आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) या संस्थांच्या वतीने राज्यसभेतील २३३ निर्वाचित सदस्यांपैकी २२५ सदस्यांचे त्यांच्यावरील दाखल गुन्हेगारी खटले व सांपत्तिक स्थिती या संदर्भात विश्लेषण करण्यात आले होते.

यूपीतील खासदार तुलनात्मक गरीब

या विश्लेषणानुसार, तेलंगणातील सात खासदारांची एकूण संपत्ती ही ५,५९६ कोटी इतकी आहे. आंध्र प्रदेशातील ११ खासदारांची संपत्ती ३,८२३ कोटी आहे. उलटपक्षी, उत्तर प्रदेशातील ३० खासदारांची एकूण संपत्ती ही १,९४१ कोटी इतकी असल्याचे पुढे आले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

  • राज्यसभेतील ७५ (३३ टक्के ) खासदारांनी दाखल असलेले खटले संसदेला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहेत.

  • यामध्ये ४१ (१८ टक्के) खासदारांनी गंभीर फौजदारी खटल्यांची नोंद केली आहे.

  • चार सदस्यांनी महिला अत्याचारविषयक खटल्यांचीही नोंद केली आहे.

राज्यनिहाय अब्जाधीश खासदार

राज्य -खासदार -अब्जाधीश -टक्केवारी

आंध्र प्रदेश- ११- ५ -४५

तेलंगण -७- ३ -४३

महाराष्ट्र -१९ -३- १६

दिल्ली -३ -१- ३३

पंजाब -७- २ -२९

हरियाना -५ -१- २०

मध्य प्रदेश -११- २ -१८

गुन्हेगारी खटले जाहीर केलेले खासदार (पक्षनिहाय)

पक्ष -एकूण खासदार- खटले असणारे - टक्केवारी

भाजप- ८५ -२३- २७

काँग्रेस -३० -१२- ४०

तृणमूल काँग्रेस -१३- ४- ३१

राजद -६- ५- ८३

माकप -५- ४- ८०

आप -१० -३ -३०

वायएसआर काँग्रेस- ९ -३- ३३

राष्ट्रवादी काँग्रेस- ३ -२- ६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT