Yogi Adityanath Yogi Adityanath
देश

योगींच्या मंत्रिमंडळात 18 मंत्री पदवीधर; 22 जणांवर गंभीर गुन्हे

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: यंदाचं योगींचं कॅबिनेट आधीच्या तुलनेत अधिक सुशिक्षित आहे म्हणावं लागेल. कारण कॅबिनेटमधील 45 मधील 18 मंत्री पोस्ट ग्रॅज्यूएट आहेत. त्यातील 9 मंत्री आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. आठ ग्रॅज्यूएट आणि दोन डॉक्टर आहेत. मात्र, जितके शिक्षित आहेत, तितकेच डागाळलेले मंत्री देखील आहेत. मंत्रिमंडळातील 22 मंत्री म्हणजेच (49 टक्के) मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 20 (44 टक्के) मंत्र्यांवर अत्यंत गंभीर स्वरुपाचेही गुन्हे दाखल आहेत. (Yogi Adityanath)

या मंत्र्यांमधील 39 (87 टक्के) मंत्री करोडपती आहेत. त्यांची सरासरी संपत्ती नऊ कोटी रुपये आहे. याबाबतचा खुलासा करताना काल शनिवारी असोशिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (ADR)ने ही माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, एकूण 53 मंत्र्यांपैकी 45 मंत्र्यांच्या शपथपत्राचे विश्लेषण शक्य झालं आहे. कारण इतर मंत्री कोणत्याच सदनाचे अद्याप सदस्य नाहीयेत, त्यामुळे त्यांचे विश्लेषण होऊ शकलं नाहीये. (Yogi Adityanath Takes Oath Of UP CM )

नंद गोपाल गुप्ता नंदी यांच्यावर सर्वाधिक गुन्हे

एडीआरने या मंत्र्यांकडून 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केलं आहे. त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, 22 मंत्र्यांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचं मान्य केलंय. त्यांच्यामधील सर्वाधिक गुन्हे प्रयागराजमधून जिंकलेले नंद गोपाल गुप्ता नंदी यांच्यावर आहेत. त्यांच्यावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

योगींच्या मंत्रिमंडळात यांना मिळाले स्थान
योगी यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी योगींसह केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, 9 वेळा आमदार राहिलेले सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय योगींच्या मंत्रीमंडळात सूर्य प्रताप शाही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनादेखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. (Uttar Pradesh)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT