देश

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवाद प्रकरणाची आज (बुधवार) सुनावणी झाली. नियोजित वेळेच्या एक तासापूर्वीच याची सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाचा पुढील निकाल 23 दिवसानंतर मिळणार आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या माध्यमातून न्यायालयात या खटल्याची ही सुनावणी पार पडली. अयोध्या प्रकरणी सुनावणीचा काल (मंगळवार) 39 वा दिवस होता. तसेच सर्व पक्षकारांनी आपला युक्तिवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. त्यामुळे आज अंतिम युक्तिवाद केला गेला. अयोध्येत या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आले आहे.

सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ के. पराशरन यांनी हिंदू पक्षकारांची बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT