After Controversy Nepali Restaurant Clarifies Rahul Gandhi Ordered Pure Vegetarian Food
After Controversy Nepali Restaurant Clarifies Rahul Gandhi Ordered Pure Vegetarian Food 
देश

राहुल गांधीनी मांसाहार केला नाही; रेस्टॉरंटचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

काठमांडू- मानस सरोवर यात्रेला जात असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मासांहार केल्याचे वृत्त नेपाळच्या मिडीयाने दिेले आणि एका नव्या वादाला सुरवात झाली. मात्र, यावर राहुल गांधीनी जेवण केलेल्या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देताना राहुल गांधीनी मांसाहार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राहूल गांधी 31 ऑगस्ट रोजी काठमांडू येथिल वूटू रेस्टॉरंट येथे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी राहुल गांधीनी मांसाहारी डिश जेवणासाठी मागवली होती, असे त्या रेस्टॉरंटच्या वेटरने सांगितले आणि त्यानंतर राहुल गांधी वादात सापडले होते. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

यानंतर, वूटू रेस्टॉरंटने याविषयी स्पष्टीकरण देताना राहुल गांधीनी मांसाहार केल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. वूटू रेस्टॉरंटने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ही बातमी मिडीयानेच पसरवली आहे. राहुल गांधीच्या जेवणासंबधी वूटूच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने कसलेही वृत्त मिडीयाला दिले नाही. आम्ही स्पष्ट करतो की, राहुल गांधी यांनी मेन्यू कार्ड पाहून शाकाहारी जेवणाचीच ऑर्डर दिली. त्यांनी कुठल्याही प्रकारचा मांसाहार केला नाही. त्यांनी पुर्णपणे शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT