Smriti Irani criticised Congress and Rahul Gandhi esakal
देश

गुलाम नबी आताच 'आझाद' झालेत, पण अमेठी..; इराणींनी काँग्रेससह राहुल गांधींची उडवली खिल्ली

इराणींनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव केला होता.

सकाळ डिजिटल टीम

इराणींनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव केला होता.

अमेठी : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खिल्ली उडवत गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) आता 'आझाद' झालेत; पण अमेठी (Amethi) फार पूर्वीपासून 'आझाद' झालीय, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केलीय.

आपल्या संसदीय मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांनी शनिवारी रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, गुलाम नबी आझाद यांनी नुकतेच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. काँग्रेसवाले आता त्यांच्याच नेतृत्वावर भाष्य करत आहेत. त्यामुळं मला वेगळं काही बोलण्याची गरज वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सुखी बाजगढ अमृत सरोवरच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती म्हणाल्या, काँग्रेस नेतृत्व ज्याप्रकारे आपल्याच पक्षाबद्दल, विशेषत: गांधी घराण्याबद्दल टीका करत आहे. त्यावर मला भाष्य करण्याची गरज नाहीय. मला एवढंच म्हणायचाय की, गुलाम साहेब नुकतेच 'आझाद' झाले आहेत. पण, 3 वर्षांपूर्वी अमेठीही स्वतंत्र झालीय. यावेळी इराणींनी कुपोषणमुक्त अमेठीचा नारा दिला.

विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून (Amethi Lok Sabha Constituency) राहुल गांधींचा पराभव केला होता. अमेठी ही गांधी घराण्याची पारंपरिक जागा असून त्याचं प्रतिनिधित्व संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT