Zika Virus esakal
देश

Zika Virus: आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा; 5 वर्षाच्या चिमुकलीचे झिका रिपोर्ट्स पॉजिटिव्ह

कर्नाटक राज्यात पाच वर्षाच्या चिमुकलीमध्ये झिका व्हायरसचा विषाणू आढळून आला

सकाळ ऑनलाईन टीम

Zika Virus: कोरोना व्हायरसची भिती लोकांमध्ये कमी होताच आता झिका व्हायरसने शासनाची चिंता वाढवली आहे. झिकाचा पुण्यात रूग्ण सापडल्यानंतर आता कर्नाटक राज्यात पाच वर्षाच्या चिमुकलीमध्ये झिका व्हायरसचा विषाणू आढळून आला. शासन आता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलत लवकरच नव्या गाईडलाईन जाहीर करतील असे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.

के सुधाकर यांनी सांगितले की, पुणे लॅबमध्ये पाठवल्या गेलेल्या सँपल्समध्ये झिका व्हायरसचा विषाणू सापडला. ५ डिसेंबरला एकूण तीन सँपल लॅबमध्ये पाठवले गेले होते. यातील दोन रिपोर्ट्स निगेटीव्ह तर एक पॉजिटीव्ह आली. (Health) ही रिपोर्ट एका पाच वर्षीय तरूणीची होती. या मुलीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

काय आहे झिका व्हायरस?

झिका व्हायरस डासांपासून पसरणारा व्हायरस आहे. हा आजार एडीस डासांमुळे पसरतो. या व्हायरसची बाधा धोकादायक असून तुम्हाला रूग्णालयात देखील भर्ती करावे लागू शकते. या विषाणूची लागण झाल्यास तुम्हाला त्याची लक्षणेही सहसा दिसत नाही. सांदेदुखी, डोकेदुखी, पाय दुखणे यांसारख्या समस्या तुमच्या मुलांत किंवा तुमच्यात दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT