Shah Rukh Khan Birthday esakal
देश

Shah Rukh Khan : 'पठाण'मधील गाण्याचे लोण बिहारपर्यंत; शाहरुख-दीपिकासह 5 जणांविरोधात तक्रार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात 'धार्मिक भावना दुखावल्या'च्या आरोपाखाली शाहरुख खान, दीपिका पदुकोण यांच्यासह ५ जणांविरुद्ध शुक्रवारी बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. (Shah Rukh Khan news in Marathi)

मुजफ्फरपुरचे वकील सुधीर ओझा यांनी अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पादुकोण, आदित्य चोपड़ा, जॉन अब्राहम आणि सिद्धार्थ आनंद यांच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ओझा यांनी हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. 'पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे आक्षेपार्ह असून हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहे,' असे ओझा यांनी मुझफ्फरपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

मागील काही दिवसांपासून या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयोध्यातील एका महंतांनी देखील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच बंदी न घातल्यास चित्रपटगृह पेटवून देवू, असा इशाराही महंतांनी दिला होता.

हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT