narendra modi sakal
देश

'कश्मीर फाईल्स'नंतर 'ऑपरेशन गंगा'वरही चित्रपट व्हावा; PM मोदींची इच्छा

काश्मीरमधील पंडितांच्या विस्थापनावर आधिरात काश्मीर फाईल्स हा सिनेमा असून त्याची सध्या बरीच चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'दि काश्मीर फाईल्स' या सिनेमानंतर आता 'ऑपरेशन गंगा' वरही चित्रपट व्हावा, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मोदींनी ही इच्छा व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतंय. काश्मीर फाईल्स यासारखे चित्रपट तयार व्हायला हवेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (after the Kashmir Files there should be a film on Operation Ganga PM Modi wish)

मोदी म्हणाले, पाच राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्यानंतर पंतप्रधानांचं अभिनंदन करणारी ही बैठक होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यामुळं यावेळी मोदींनी काश्मीर फाईल्स या सिनेमावर भाष्य केलं. काश्मीर फाईल्स संदर्भातील जो मुद्दा आहे तो खूप विशेष आहे. कारण या चित्रपटावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. यामध्ये दोन गट पडले आहेत. या वादामध्य़े थेट पंतप्रधानांनी या चित्रपटाची बाजू घेऊन त्या संदर्भात विधान करणं ही विशेष बाब होती. कारण त्यांनी थेटपणे या चित्रपटाचं प्रमोशन केलं.

काश्मीरमधील पंडितांच्या विस्थापनाची व्यथा सांगणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात आणि सातत्यानं भाजपची बाजू घेत असतात. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कौतुक पंतप्रधानांनी केलं. मोदी म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला काहीजण विरोध करत आहेत किंवा खोटं ठरवलं जात आहे जे केविलवाणं आहे. हे लोक उदारमताचे समर्थक असल्याचे सांगतात आणि मग अशा कलाकृतीला कसा विरोध करतात? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान पुढे म्हणाले, अशा प्रकारचे चित्रपट तयार व्हायला हवेत, यावरुन त्यांनी एका अर्थानं चित्रपटाचं मोठं प्रमोशनच केलं आहे. महात्मा गांधींवरील सिनेमा पहिल्यांदा एका परदेशी व्यक्तीनं बनवला, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला अर्थात 'ऑपरेशन गंगा' बद्दलही त्यांनी भाष्य केलं. ज्या राज्यांमध्ये बिगर भाजप सरकारं आहेत त्यांनी या मोहिमेला मदत करण्याऐवजी टीका केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT