Agneepath protest Air Chief Marshal Chaudhary warns protesters Agneepath protest Air Chief Marshal Chaudhary warns protesters
देश

Agneepath : एअर चीफ मार्शल चौधरी यांचा आंदोलकांना इशारा; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या भरतीवर तरुणांकडून अशा हिंसक (Agneepath protest) प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. आंदोलन करणाऱ्या तरुणांना पुढे याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण, पोलिसांच्या पडताळणीत गुन्हे दाखल असल्याचे आढळल्यास नोकरी मिळणार नाही, असा इशारा निदर्शनात सहभागी असलेल्यांना एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air Chief Marshal Chaudhary) यांनी दिला. (Agneepath protest Air Chief Marshal Chaudhary warns protesters)

आम्ही या प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करतो. शेवटची पायरी पोलिसांची पडताळणी असते. आंदोलनात (protesters) सहभागी असलेल्यांना पोलिसांकडून मंजुरी मिळणार नाही, असे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी म्हणाले. अग्निपथ योजनेचा विरोध पाहता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अग्निवीरांचा क्रीडा मंत्रालयात समावेश करण्याचा विचार करीत असल्याचे म्हटले आहे.

अग्निपथ योजनेला (Agneepath protest) मोठ्या प्रमाणावर होणारा विरोध पाहता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी (ता. १८) तिन्ही लष्करप्रमुखांची बैठक घेतली. संरक्षणमंत्र्यांची लष्करप्रमुखांसोबतची ही बैठकही महत्त्वाची आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधातील आग १३ राज्यांमध्ये पसरली आहे. तीन दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये तरुणांनी तीव्र निदर्शने केली आहे.

आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रालयातील भरतीमध्ये अग्निवीरांसाठी (agniveer) १० टक्के आरक्षणाच्या (reservation) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाने अग्निवीरांना त्यांच्या विभागातील नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT