Agneepath Scheme Latest News Agneepath Scheme Latest News
देश

अग्निपथ योजना : जात प्रमाणपत्रावर लष्कराकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सैन्यात भरतीसाठी जात आणि धर्माचे प्रमाणपत्र मागितल्याबद्दल भारतीय लष्कराच्या (Army) अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले आहे. लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अग्निपथ योजनेअंतर्गत (Agneepath Scheme) लष्करी भरती प्रक्रियेत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. सैन्यात भरतीच्या वेळी जात, धर्म आदी प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. यात नवीन काहीच नाही. लष्कराच्या या वक्तव्यानंतर भाजपने विरोधकांना चांगलेच घेरले आहे. (Agneepath Scheme Latest News)

भाजपचे (BJP) प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस आणि आप हे पक्ष वेळोवेळी भारतीय लष्करावर प्रश्न उपस्थित करताना दिसले आहेत. भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी अग्निवीरमध्ये जात आणि धर्माचा उल्लेख करून जी भाषा वापरली आहे ती अस्वस्थ करणारी आहे, असेही ते म्हणाले.

हे लोक जात आणि धर्माच्या आधारावर सैन्य भरतीचा आरोप करीत आहेत. याचे मला खूप वाईट वाटते. त्यांना सत्य माहीत नाही. सत्य हे आहे की, भारतीच्या सैन्यात (Army) धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर भरती होत नाही. भारतीय लष्कर जात आणि धर्माच्या वर आहे, असेही पात्रा म्हणाले.

याआधी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, १९४९ पासून सुरू असलेली व्यवस्था कायम आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT