Agneepath Scheme petition Supreme Court Demand cancellation of notification Agneepath Scheme petition Supreme Court Demand cancellation of notification
देश

Agneepath Scheme : अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लष्करातील भरतीसाठी अग्निपथ योजनेविरोधात (petition) दाखल केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. या योजनेमुळे कारकीर्द २० वर्षांऐवजी केवळ चार वर्षांची होईल, असे जनहित याचिकांमध्ये हवाई दलातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या सुटी खंडपीठासमोर हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

माझी विनंती आहे की सरकारने भरतीसाठी जारी केलेली अधिसूचना (notification) रद्द करावी. सरकार कोणतीही योजना आणू शकते. पण इथे योग्य आणि अयोग्य हा मुद्दा आहे. आताही ७० हजार लोक नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत आहेत, असे याचिका दाखल करणारे अधिवक्ता एमएल शर्मा म्हणाले. अग्निपथ योजना किमान अशांना लागू होऊ नये जे आधीच चालू भरती प्रक्रियेत गुंतलेले आहेत आणि नियुक्ती पत्रांच्या प्रतीक्षेत आहेत, असेही ते म्हणाले.

सैनिकांच्या कारकिर्दीचा प्रश्न असल्याने यावर तातडीने सुनावणी व्हायला हवी. अनेक प्रयत्न करूनही रजिस्ट्री विभागाने तारीख दिली नसल्याचे वकिलाने सांगितले. न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) १४ जून रोजी जारी केलेली अधिसूचना रद्द करावी. ज्यामध्ये अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती, असेही शर्मा म्हणाले.

याप्रकरणी आणखी एक अर्ज अधिवक्ता विशाल तिवारी यांच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. अग्निपथ योजनेची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. या योजनेचा तरुणांच्या भवितव्यावर आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर काय परिणाम होईल हे समितीने ठरवावे, असे विशाल तिवारी म्हणाले.

केंद्र सरकारच्या वतीनेही तक्रार

अग्निपथ योजनेच्या विरोधात दाखल झालेल्या याचिका पाहता केंद्र सरकारच्या वतीनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात सरकारने म्हटले आहे की, कोणताही निर्णय देण्यापूर्वी न्यायालयाने (Supreme Court) या मुद्द्यावर सरकारची बाजूही ऐकून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमधील सुरतमध्ये भीषण बस अपघात; महाराष्ट्रातील दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT