देश

भारताची लष्करी ताकद वाढली, अग्नी ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

सकाळ डिजिटल टीम

५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात आणखी भर पडली. ५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची चाचणी बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी करण्यात आली. अग्नी-५ ची क्षमता आणि अचूकता ही अन्य क्षेपणास्त्राच्या तुलनेत अधिक असणार आहे. मात्र ही चाचणी संरक्षण सिद्धतेत वाढ करण्यासाठी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्नीची हल्ला करण्याची क्षमता जास्त असून तब्बल ५ हजार किलोमीटरपर्यंत अचून लक्ष्य वेधू शकते. या क्षेपणास्त्राच्या चाचणीबाबत चीनने चिंता व्यक्त केली होती. अॅग्नी ५ बॅलेस्टिक मिसाइलमध्ये लेव्हल ३ इंधन इंजिन आहे. ५ हजार किलोमीटर रेंजमध्ये अचूक असे लक्ष्य वेधण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.

लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या क्षेपणास्त्राची यशस्वी अशी चाचणी झाली आहे. यामुळे चीनला एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे. भारताच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जमिनीवरून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. अग्नि ५ ची चाचणी देशाला संरक्षणाच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी केली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

इंटर कॉन्टिनेन्टंल बॅलेस्टिक मिसाईल हे जगातील काही देशांकडे आहे. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्रायल, ब्रिटन, चीन, उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. आता यानंतर भारतसुद्धा इंटर कॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाइल असलेला ८ वा देश ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rule: RBI चा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार! आता ही गोष्ट केल्याशिवाय पेमेंट होणार नाही...

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

Iran-Israel War: युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून भारताला तेलाची बंपर ऑफर; 'अशी' होणार डील...

"म्हणून स्वप्नीलने मला 1000 रुपये दिले" ; अभिनेत्याने सांगितला खास किस्सा, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

SCROLL FOR NEXT