देश

अग्निपथ योजनेला बिहारमध्ये विरोध पोलिसांकडून आश्रूधुराचा वापर

केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध म्हणून जेहानाबादमध्ये रेल्वे ट्रॅक अडवत विद्यार्थ्यांनी ट्रेनवर दगडफेक केली.

सकाळ डिजिटल टीम

पाटना : केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) विरोधात देशातील काही भागातून मोठा विरोध (Protest) होताना दिसत आहे. या योजनेविरोधात बिहारमध्ये युवकांनी केंद्रा विरोधात निदर्शने करत जाळपोळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, काही तरुणांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केल्याने पाटणा-गया रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन (Protest) करण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक अडवण्यात आली आहे. (Agnipath Scheme Protest News)

केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध म्हणून जेहानाबादमध्ये रेल्वे ट्रॅक अडवत विद्यार्थ्यांनी ट्रेनवर दगडफेक (Stone Pelting) केली. या घटनेत काही जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. आराहमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून विरोध करणाऱ्या जमावाला पांगवले. बिहारबरोबरच उत्तर प्रदेशातही केंद्राच्या या योजनेला तरूणांकडून मोठा विरोध केला जात असून, पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये सकाळपासून शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार असल्याने चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

गुरुग्राममध्ये हायवे जाम

अग्निपथ योजनेला विरोध म्हणून हरियाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन करण्यात येत आहे. गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्ग रोखण्यात आला आहे. त्याच वेळी, तरुणांनी बिलासपूर पोलीस स्टेशन परिसरात एनएच 48 रोखून धरला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सैन्यात भरती होत नसून आता केवळ 4 वर्षांची भरती होणार असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.

चार वर्षांनी कुठे जाणार?

केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्न विद्यार्थांकडून उपस्थित केला जात आहे. चार वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून या युवकांना जवळपास 12 लाख रुपयांचा सेवा निधी देणार आहे. मात्र, या युवकांना पर्यायी रोजगार देण्यासाठी कोणती योजना सरकारकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT