देश

Agniveer Amritpal Singh Death: अग्निवीर अमृतपाल सिंगचा मृत्यू कसा झाला? लष्करी इतमामात अंत्यसंस्कार का नाही? दिलं सविस्तर स्पष्टीकरण

अग्निवीराच्या मृत्यूनंतर अनेक जणांनी लष्करावर विविध प्रकारचे आरोप केले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सन २०२२ मध्ये अग्निवीर म्हणून भरती झालेल्या पंजाबच्या अमृतपाल सिंग नामक तरुणाचा काश्मीरमध्ये गोळी लागून मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी या तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे.

त्याचबरोबर भारतीय लष्कराकडून लष्करी इतमामात त्यांच्यावर अत्यंसंस्कारही झाले नाहीत. या आरोपांना उत्तर देताना त्याचा मृत्यू कसा झाला?

लष्करानं त्यांना सलामी का दिली नाही? याचं स्पष्टीकरण आता लष्करानं एका निवेदनाद्वारे दिलं आहे. (Agniveer Amritpal Singh Death Case How did he died Why didnt army gives salute explanation by Indian Army)

गोळी लागल्यानं झाला मृत्यू

अग्निवीर अमृतपाल सिंग काश्मीरमध्ये तैनात असताना गोळी लागल्यानं गंभीररित्या जखमी झाला होता. या अवस्थेत त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा वाचवता आलं नाही. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर लष्करी इतमामात त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कारही झाले नाहीत. त्याचं पार्थिव शरीर लष्कराच्या वाहनाऐवजी खासगी रुग्णवाहिकेतून त्याच्या घरी पाठवण्यात आलं.

अमृतपाल सिंगचा मृत्यू कशामुळं?

११ ऑक्टोबर २०२३ रोजी काश्मीरच्या राजौरी भागात स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळं अमृतपाल सिंगचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जात आहे. ही दुर्घटना खूपच दुःखदायक आहे, असं भारतीय लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. (Latest Sport News)

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार का नाही?

लष्कराच्या माहितीनुसार, अग्निवीर अमृतपाल सिंग याचा मृत्यू स्वःच्याच चुकीमुळं गोळी लागून झाल्यामुळं सध्याच्या धोरणांनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये कुठल्याही प्रकारचा गार्ड ऑफ ऑनर आणि लष्करी इतमामात अत्यंसंस्काराच्या प्रक्रियेचा समावेश होत नाही. भारतीय लष्कराकडून शोकाकुल कुटुंबाप्रती मनापासून सहवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT