Principal Thrashes Teacher 
देश

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

उत्तर प्रदेशच्या आग्रामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ( viral Video) होत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या आग्रामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ( viral Video) होत आहे. पूर्व-माध्यमिक शाळेतील एका मुख्याध्यापिकीने उशिरा आल्याच्या कारणावरुन शिक्षिकेला मारहाण केली आहे. आग्राच्या सिगाना गावातील ही घटना आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंर्भातील बातमी दिली आहे.

मुख्याध्यापिकीने महिला शिक्षिका गुंजन चौधरी हिला मारहाण केली, तसेच तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्याध्यापिका शिक्षिकेला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. तसेच शिक्षिकेचा कुर्ता ओढत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ एकाने शूट केला आहे. व्हिडिओमध्ये आवाज येत आहे की, 'हे सर्व शूट केलं जात आहे. मॅडम तुम्ही खूप वाईट वागत आहात. तुम्हाला हे शोभत नाही.' घटनेमध्ये शिक्षिका जखमी झाली आहे, असा दावा इतर शिक्षिकांनी केला आहे. (Principal Thrashes Teacher)

व्हिडिओमध्ये मुख्याध्यापकिचा ड्रायव्हर देखील दिसून येत आहे. तो भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण, मुख्याध्यापिका मारहाण सुरुच ठेवत असल्याचं दिसतंय. तसेच शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्यामध्ये शा‍ब्दिक चकमक देखील पाहायला मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापिकेने जखमी शिक्षिकेविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

दरम्यान, शाळेच्या वर्गातच ही घटना घडली असल्याने लोक यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकाच असं वर्तन करत असतील तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडेल. विद्यार्थी यातून काय शिकवण घेतील. व्हिडिओमध्ये काही विद्यार्थीपण दिसत आहेत. जबाबदार व्यक्तींनी किमान शाळेच्या आवारात तरी चांगली वागणूक ठेवावी अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT