Rajmata Ahilyadevi Holkar Sakal
देश

Photo: फक्त काशीचं नाही, अहिल्याबाईंनी देशभरातील ५० मंदिराचा जीर्णोद्धार केलाय

त्यांनी आपली खासगी संपत्ती दानधर्म आणि देवळे घाट बांधण्यात खर्च केली पण त्यांनी आपल्या दानाचा कधी गाजावाजा केला नाही.

दत्ता लवांडे

आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. त्यांनी आपल्या पराक्रमाने मैदान गाजवलेच पण त्यांनी आपली खासगी संपत्ती दानधर्म आणि देवळे घाट बांधण्यात खर्च केली आहे. पण त्यांनी आपल्या दानाचा कधी गाजावाजा केला नाही. फक्त काशी विश्वनाथच नाहीतर त्यांनी भारतातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. उपलब्ध पुराव्यानुसार त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या ५३ मंदिरांचा उल्लेख आढळतो.

त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली आहे. तसेत आलमपूर, गया, चिखलदरा, जगन्नाथपूरी, जांबगाव, चांदवड, जेजुरी, देवप्रयाग, द्वारका येथील मंदिरे बांधले तर काही पडझड झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
काशी विश्वनाथ मंदिराबरोबर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर, उज्जैन, आयोध्या,कर्नाटक, ओंकार, केदारनाथ, कुरूक्षेत्र.कोल्हापूर, गंगोत्री अशा ठिकाणच्या हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे.
तसेच त्यांनी काही ठिकाणी आश्रमशाळा बांधल्या तर काही ठिकाणी अन्नछत्र सरू केले. काही मंदिरांसाठी त्यांनी घाट बांधून दिले आहेत. काही ठिकाणी कुंडे बांधून दिली आहेत.
द्वारका, मथुरा, पंढरपूर, प्रयाग, पैठण, पुणतांबा, बद्रीनारायण, बिठूर, मथुरा, रामेश्वर, वेरूळ, सोमनाथ, संगमनेर, सातारा, हरिद्वार अशा ठिकाणच्या मंदिरांची डागडुजी करत त्यांचा जीर्णोद्धार केला आहे.
त्यांच्या दानाच्या आणि मंदिरांच्या जीर्णोद्धाराची यादी वाचली तर त्यांनी केलेल्या भारतभर केलेला प्रवास आणि लोकांप्रती असलेला वात्सल्यभाव लक्षात येतो. ही सगळी कामं त्यांनी आपल्या खासगी संपत्तीतून केली आहेत पण कधी गाजावाजा केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT