53 crimes in porn video cases in the Nagpur 
देश

नवऱ्याची पत्नीवर अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती, महिलेची पोलिसात तक्रार

IT कंपनीचा मालक असलेला नवरा पॉर्न फिल्मच्या प्रभावाखाली होता.

दीनानाथ परब

अहमदाबाद: खासगी कंपनीत (private company) नोकरी करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने नवऱ्याविरोधात अनसैर्गिक शरीरसंबंध आणि घरगुती हिंसाचाराची (domestic violence) पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आरोपी पती एका आयटी कंपनीचा (IT Company) मालक आहे. नवरंगपुरा पोलिसांनी ही माहिती दिली. लग्न झाल्यापासून नवरा (husbund) आपल्याला छोट्या-छोट्या कारणांवरुन मारहाण करत आहे तसेच सतत अनसैर्गिक शरीरसंबंधांची मागणी करतो असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तक्रारदार महिला नवरंगपूर येथे रहायला आहे. चार महिन्यापूर्वी नवऱ्याने आपल्याला सोडून दिले व आता आपण आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत आहोत, असे महिलेने सांगितले. इच्छा नसताना नवरा अनसैर्गिक शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करतो. त्याला विरोध केल्यानंतर मारहाण करतो, असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

"पॉर्न फिल्मच्या प्रभावाखाली येऊन नवरा अनैसर्गिक शरीरसंबंधांची जबरदस्ती करायचा. अगदी छोट्या-मोठ्या गोष्टीवरुन नवरा मारहाण करायचा" असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. नवऱ्याच्या अशा वागण्याला महिला कंटाळली होती. संसार मोडू नये, कुटुंबीयांच्या दबावामुळे प्रत्येकवेळी ती तडजोड करायची.

पण त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. अखेर महिलेने या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नवरा एक मोठी आयटी कंपनी चालवतो. पैसा वापरुन तो पोलिसांनाही प्रभावित करु शकतो, या शक्यतेमुळे महिला बरेच दिवस शांत राहिली, अधिकाऱ्याने ही माहिती दिली. घरगुती हिंसाचारा कायदा आणि आयपीसीच्या कलम ३७७ (अनैसर्गिक शरीरसंबंध) या कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT