shashikala. 
देश

चार वर्षांच्या शिक्षेनंतर जयललितांच्या मैत्रिण शशिकला तुरुंगाबाहेर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- AIADMK मधून हकालपट्टी झालेल्या नेत्या शशिकला यांची बेंगळुरु तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर बुधवारी त्यांची सुटका करण्यात आली.  त्यांच्या सुटकेसंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे असले तरी विक्टोरिया हॉस्पिटलमधील त्यांचे उपचार सुरुच राहणार आहे. शशीकला यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांना 66 कोटी रुपयांच्या संपत्तीप्रकरणी फेब्रुवारी 2017 मध्ये तुरुंगात जावं लागलं होतं. आता चार वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर शशिकला यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती आणि त्यांच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या. समर्थकांनी यादरम्यान पेढेही वाटले. 

कोरोनाची लागण झाल्याने शशिकला यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. विक्टोरिया हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातील कोरोनाची लक्षणं कमी झाली असून प्रकृती स्थिर आहे. शिक्षा भोगत असतानाच त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. भ्रष्टाचारप्रकरणी त्या शिक्षा भोगत होत्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT