AIIMS Delhi to start human trials of Covaxin from today 
देश

भारतातील लस बनवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनावरील लस बनवण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. अशात भारतातील कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात झाली आहे. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार होत असल्याचे जाहीर केले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सर्वाच्या नजरा कोविड-१९ आजाराला प्रतिबंध करणारी लस कधी तयार होते याकडे लागल्या असताना भारत बायोटेकची वाटचाल ही दिलासादायक आहे. या लसीची मानवी चाचणीही आता सुरु झाली असून दिल्लीतील एआयआयएसएस (इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सोबत मिळून फार्मा कंपनी या लशीची मानवी चाचणी घेणार आहे. दोन टप्प्यात ही चाचणी होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर प्रयोग
पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे. यापैकी १०० जण एआयआयएसएसमधील असतील. १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे.

लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. कोवॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एआयआयएसएस हे एक ठिकाण आहे. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT