Asaduddin Owaisi esakal
देश

'Asaduddin Owaisi 'राष्ट्रवादी' नसले, तरी 'देशभक्त' आहेत'

सकाळ डिजिटल टीम

असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.

Aimim खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असं सर्व पक्षांच्या नेत्यांनी म्हंटलंय. भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून केवळ कट्टरपंथीयांनाच खासदार ओवेसींची हत्या करायला आवडेल. शिवाय ओवेसी हे राष्ट्रवादी नसले, तरी देशभक्त जरुर आहेत, असंही स्वामींनी ट्विटव्दारे सांगितलंय.

आपल्या विधानांमुळं आणि युक्तिवादामुळं चर्चेत असलेले भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, तर्काच्या परंपरेवर विश्वास नसणाऱ्या कट्टरपंथीयांनाच खासदार ओवेसींची हत्या करायचीय. ओवेसी भले राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत. फरक एवढाच आहे की, ओवेसी आपल्या देशाचं रक्षण करतील; पण हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे यावर त्यांचा विश्वास नाहीय, असं ते म्हणाले.

'ओवेसी पूर्वजांना हिंदू मानत नाहीत'

सुब्रमण्यम स्वामी यांनी ओवेसींबाबत यापूर्वीही आपलं मत मांडलंय. 2016 मध्ये ते म्हणाले होते, ओवेसी हे देशभक्त आहेत. कारण, परदेशात ते भारताचं रक्षण करतात. मात्र, आपल्या पूर्वजांना ते हिंदू (Hindu) मानत नाहीत. गुरूवारी सायंकाळी खासदार ओवेसी यांनी दावा केलाय की, उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रचारादरम्यान मेरठहून परतत असताना त्यांच्या कारवर छिजारसी टोल प्लाझा येथे 4 राऊंड गोळीबार करण्यात आला आहे, असं त्यांनी म्हंटलंय. याप्रकरणी तत्काळ कारवाई करत यूपी पोलिसांनी सचिन पंडित आणि शुभम या दोन आरोपींना अटक केलीय. या दोघांनाही शुक्रवारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. ओवेसींच्या वक्तव्यामुळं दोन्ही आरोपी संतप्त झाल्याचं यूपी पोलिसांनी म्हंटलंय. आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं ओवेसींना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र, ओवेसींनी सुरक्षा घेण्यास नकार दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT