Coonoor Helicopter Crash Air Chief Marshal VR Chaudhari ANI
देश

कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅश तपासात आम्ही सर्व अँगल तपासणार : एअर चीफ मार्शल

कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅश आम्ही तपासात आम्ही सर्व अँगल तपासणार : एअर चीफ मार्शल व्ही आर. चौधरी

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस (CDS) बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये (Coonoor Helicopter Crash) दुर्दैवी मृत्यू झाला. या कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशच्या चौकशीबाबत भारताचे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Chief Marshal VR Chaudhari) यांनी आज (दि. 18 ) माहिती दिली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही या हेलिकॉप्टर क्रॅशबाबत तपासात सर्व अँगल आणि सर्व घटकांवर आधारित तपास करत आहोत. तपासात कोणताही अँगल वगळण्यात येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. व्हीव्हीआयपी कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅश नंतर घातपाताची शक्यताही वर्तवण्या आली होते.

भारताचे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशच्या (Coonoor Helicopter Crash) तपासाबाबतची माहिती माध्यमांनी दिली. यावेळी त्यांनी 'आतपर्यंत झालेल्या तपासात काय काय आढळून आले आहे याची माहिती इतक्यात देणे योग्य ठरणार नाही अजून तपास सुरु आहे. या क्रॅशसंदर्भात तपासात सगळे अँगल आणि प्रत्येक छोटी गोष्ट आम्ही तपासणे गरजेचेच आहे. आम्ही काय चुकीचे घडले हे शोधून काढू आणि त्यावर उपाय देखील सुचवू.' अशी प्रतिक्रिया दिली.

त्यानंतर व्ही. आर. चौधरी (Air Chief Marshal VR Chaudhari) यांनी कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशनंतर व्हीव्हीआयपींच्या उड्डाणाबाबतचा प्रोटोकॉल बाबतही आपले म्हणणे मांडले. ते म्हणाला की, 'आम्ही कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशनंतर व्हीव्हीआयपींच्या उड्डाणाबाबतच्या प्रोटोकॉलची पुन्हा समिक्षा करु. या संदर्भातील प्रत्येक प्रक्रिया तपासून पाहिली जाईल. आम्ही पाकिस्तान (Pakistan) आणि चीनकडून (China) होणाऱ्या प्रत्येक धोके पडताळून पाहत आहोत आणि आम्हाला त्याबाबत पूर्ण कल्पना आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT