Rafale 
देश

चीन सीमेवर राफेलच्या तैनातीचा विचार; हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या आठवड्यात चर्चा 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली -  नियंत्रण रेषेवर चीनच्या उपद्रवाला चाप लावण्यासाठी आता अत्याधुनिक लढाऊ राफेल विमाने भारत-चीन सीमेवर तैनात करण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवर सुरू आहे. हवाई दलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आगामी आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर विचारमंथन होईल. या महिन्याच्या अखेरीस फ्रान्सकडून राफेल विमानांचा ताफा भारतात दाखल होणार आहे. 

हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची २२ आणि २३ जुलैला बैठक होणार आहे. त्यात सरहद्दीची सुरक्षा, आगामी आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्याची तयारी यावर चर्चा होईल. अर्थातच यामध्ये लडाखमधील तसेच संपूर्ण चीन सीमेवरील परिस्थितीचा विचार करता लढाऊ विमानांची तैनाती आणि कारवाईची सज्जता याचा विचारविनिमय होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

गलवान खोऱ्यात १५ आणि १६ जूनला भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर तणाव कमी करण्याचे दोन्ही देशांचे लष्करी आणि राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र चिनी सैन्याने अजूनही मोक्याच्या ठिकाणाहून माघार घेतली नाही. ताबा रेषेवर पाच मे पूर्वीची स्थिती हवी यावर भारत ठाम आहे. केवळ लडाख सीमेवरच नव्हे तर अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चिनी सैन्याच्या हालचाली चिंताजनक पद्धतीने वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारताने संरक्षण सज्जता वाढविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिनाअखेरीस फ्रान्समधून राफेल लढाऊ विमाने देशात दाखल होणार आहेत. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रांसारखी शस्त्रसामग्री यावर बसविण्यात आल्याने भारतीय हवाई दलाचा मारा अधिक धारदार आणि भेदक होईल. या राफेल विमानांची आणि भारतीय ताफ्यात असलेल्या रशियन बनावटीच्या शस्त्रसामग्रीची सांगड घालण्याचाही हवाई दलाचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सुखोई-३०’, ‘मिग’ही सज्ज 
हवाई दलाने ‘मिराज २०००’ विमानांचा ताफा तैनात केला आहे. तर, सुखोई-३० , मिग – २९ विमाने ही सरहद्दीजवळच्या तळांवर सुसज्ज आहेत. अत्याधुनिक ‘अपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले असून रात्रीच्या वेळी देखील लडाखमध्ये गस्त घातली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT