nirmala.jpg 
देश

एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियमची मार्चपर्यंत विक्री होणार : निर्मला सीतारमण

वृत्तसंस्था

दिल्ली : सध्या देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे चित्र. सरकारी धोरणे देखील त्यामुळे बदलताना दिसत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांच्या विक्रीबाबतचं सरकारचं धोरण स्पष्ट केलं आहे. मार्चपर्यंत या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. 

दरम्यान, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण म्हणाल्या की, आर्थिक मंदीतून बाहेर येण्याकरता काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आतापर्यंत अनेक पावलं उचलली गेली आहेत. या दोन कंपन्यांच्या विक्रीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत या कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. एअर इंडियासाठी विक्री प्रस्ताव गेल्यावर्षीच निश्चित झाला होता.

मात्र, गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. यावर्षी या प्रक्रियेसाठी गुंतवणूकदारांनीच उत्साह दाखवला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. 
अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि त्यावरील उपाय यांबाबतही सीतारमण यांनी या मुलाखतीत सविस्तर सांगितलं. त्या म्हणाल्या की, काही क्षेत्रांमध्ये नियमन केल्याने जीएसटीतून होणाऱ्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येतील.

सर्वोच्च न्यायालयाचा एस्सार स्टील प्रकरणावरील निकाल पाहता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या निकालामुळे पुढील तीन महिन्यात बँकांच्या बॅलन्सशीटवर दिसून येतील. सणासुदीच्या निमित्ताने कर्जांची देवाणघेवाण हेही एक आशादायक चित्र असल्याचं सीतारमण यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT