Air-India-Company 
देश

केंद्र सरकार करणार एअर इंडियाचं खाजगीकरण?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या केंद्र सरकार भारताची हवाई वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनींपैकी एक असणाऱ्या एअर इंडिया या कंपनीचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी चालविण्यासाठी केंद्र सरकारच इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एअर इंडियाच्या खाजगीकरणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष असून ही खाजगीकरणाची प्रक्रिया लवकर पार पाडण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली. 

गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक अडचणींचा सामना करते आहे. HPCL, BPCL आणि IOC या कंपन्या एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा करत होत्या. मात्र, या कंपन्यांचे बिल काही दिवसांपासून थकविल्याने या कंपन्यांनी इंधन पुरवठा बंद केला आहे.

तसेच एअर इंडियातील कर्मचाऱ्यांवर दरमहा 300 कोटी रुपयांचा खर्च होतो. 2017-18 या वर्षी एअर इंडिया कंपनीवर 55,000 कोटी रुपयांचे कर्ज होते. 2018-19 ला त्यामध्ये वाढ होऊन हा आकडा 58,351.93 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कंपनीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Kolhapur - Navi Mumbai Filght : कोल्हापूरच्या हवाई सेवेत नवा अध्याय; नवी मुंबईसाठी थेट उड्डाण सुरू

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

SCROLL FOR NEXT