air india Sakal
देश

प्रवाशाची क्रू मेंबरला मारहाण! Air Indiaचं दिल्ली-लंडन विमान अर्ध्यातूनच परतलं

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : प्रवाशाकडून क्रू मेंबरला विमान हवेत असताना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पण यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारामुळं ज्या विमानात हा प्रकार घडला ते दिल्ली-लंडन विमान अर्ध्यातून पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आलं. यानंतर एअर इंडियानं संबंधित प्रवाशाविरोधात दिल्ली एअरपोर्ट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीत दोन क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत. (Air India Delhi London Flight Returns Midway After Unruly Passenger Hits Crew)

विमानात नक्की काय घडलंय?

एअर इंडियानं या घटनेबाबत जाहीर केलेल्या निवदेनात म्हटलं की, एअर इंडियाचं AI111 विमान दिल्लीहून लंडनच्या हिथ्रो विमानतळाकडं निघालेल्या विमानानं १० एप्रिल २०२३ रोजी पहाटे ६.३५ वाजता दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केलं. पण या विमानातील एका प्रवाशानं विमानाच्या क्रू मेंबर्सना बेदम मारहाण केली, असा प्रकारचा गंभीर प्रकार घडल्यानं विमानाच्या पायलटनं विमान पुन्हा दिल्लीकडं वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान लँड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. विमानात असलेल्या सर्वांची सुरक्षा आणि आत्मसन्मान जपणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. ज्या क्रू मेंबर्सना मारहाण झाली त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करु. यानंतर प्रवाशांना मनस्ताप झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत दुपारी पुन्हा विमान लंडनसाठी शेड्यूल करण्यात आल्याचंही एअर इंडियानं आपल्या निवदेनात म्हटलं आहे.

विमानात वारंवार घडताहेत घटना

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. एका प्रवाशाकडून महिलेच्या सीटवर लघवी केल्याच्या प्रकरणानंतर नुकतेच डीजीसीआयनं एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांच्या एका पायलट इन चार्जचं लायसन्सही तीन महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. आपल्या कर्तव्याचं व्यवस्थित पालन न केल्याबद्दल डिरेक्टर इन फ्लाईट सर्व्हिसेसला देखील ३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Laxman Hake : हा थिल्लरपणा... जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

Belagav Farmers Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दगडफेकीत सहा पोलिसांसह अनेक जण गंभीर जखमी

अखेर बावनकुळेंच्या खात्याला जाग; फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरणाऱ्या पार्थ पवारांच्या कंपनीला ४२ कोटींची नोटीस

Latest Marathi News Live Update : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

SCROLL FOR NEXT