Delhi air pollution esakal
देश

Delhi Air Pollution : दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाचा कहर! विषारी हवेत श्वास घेणंही झालं कठीण

रोहित कणसे

मागील काही दिवसांमध्ये दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या शहरांमधील हवा प्रदुषण चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विषारी धुक्यामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात वाढते प्रदूषण धोक्याची घंटा ठरत असून दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोयडा, फरीदाबाद, गाजियाबाग यांच्यासह एनसीआर मध्ये हवेची गुणवत्ता (एअर क्वॉलिची इंडेक्स (AQI) अत्यंत गंभीर बनली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) च्या आकडेवारीनुसार दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI)आज (सोमवार, ६ नोव्हेंबर) ४०० च्या वर गेला आहे. शून्य ते ५० च्या दरम्यान एक्यूआय चांगला मानला जातो, ५१ ते १०० च्या दरम्यान समाधानकारक, १०१ ते २०० च्या मध्ये मध्यम, २०१ ते ३०० च्या दरम्यान खराब, ३०१ ते ४०० च्या दरम्यान खूपच खराब आणि ४०१ ते ५०० च्या मध्ये एक्यूआय गंभीर मानला जातो.

विषारी स्मॉगमुळे दिल्ली-एनसीआर मध्ये लोकांचे जगणे कठीण झाले आहे, नागरिकांना श्वास घेणे देखील अवघड झाले असून यामुळे लोकांना गळ्यात खरखर, डोळे जळजळणे आणि श्वास घेण्यात अडचण येणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) च्या अंदाजानुसार, दिल्लीज एनसीआर मध्ये अजून पुढील दोन दिवस सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीत फायर ब्रिगेडला प्रदूषण कमी करण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्त्यांवर टँकर्सच्या मदतीने पाणी फवारले जात असून याच्या मदतीने धूळ कमी करून एअर क्वॉलिटी इंडेक्स सुधारण्यासठी प्रयत्न केले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात दिल्ली आणि उत्तर भारतात प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT