Tony Fernandes Linkedin Post eSakal
देश

Air Asia : कंपनीच्या सीईओंनी चक्क मसाज घेत अटेंड केली मीटिंग, 'शर्टलेस' फोटो व्हायरल; नेटिझन्सच्या विविध प्रतिक्रिया

या पोस्टवरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

Sudesh

एअर एशिया कंपनीचे सीईओ टोनी फर्नांडिस हे सध्या चर्चेत आहेत. याला कारण ठरतोय त्यांचा व्हायरल होत असणारा एक फोटो. टोनी यांनी इंडोनेशिया आणि एअर एशिया कल्चरचं कौतुक करणारी एक पोस्ट आपल्या लिंक्ड-इन अकाउंटवरुन शेअर केली होती. मात्र या पोस्टवरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

टोनी यांनी आपल्या पोस्टसोबतच स्वतःचा एक फोटोही जोडला आहे. यामध्ये ते एक व्हर्चुअल मीटिंग अटेंड करत आहेत. ही मीटिंग सुरू असताना ते शर्टलेस बसले आहेत, आणि मसाज देखील घेत आहेत.

"हा आठवडा अगदीच तणावाचा होता. मात्र, इंडोनेशिया आणि एअर एशिया कल्चर एवढं चांगलं आहे, की मी मसाज घेत असतानाच मॅनेजमेंट मीटिंग देखील अटेंड करू शकतो. आम्ही चांगली प्रगती करत आहोत, आणि कॅपिटल ए स्ट्रक्चर फायनल केलं आहे. यापुढचा प्रवास रोमांचक असणार आहे. आम्ही जे उभारलं आहे, त्याचा मला अभिमान आहे." असं टोनी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Tony Fernandes Linked In Post

या पोस्टमध्ये त्यांनी कंपनीचं कौतुक केलं असलंं, तरी त्यांच्यावर फोटोमुळे मोठ्या प्रमाणात टीका होता आहे. कित्येक नेटकऱ्यांनी अशा प्रकारे मीटिंग अटेंड करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तुमची कंपनी कितीही मनमोकळी असली, तरीही हे योग्य नाही. तुम्ही सीईओ असाल किंवा साधा कर्मचारी - तुम्ही अशा प्रकारे शर्टलेस होऊन आणि मसाज घेत मीटिंग अटेंड करणं चुकीचं असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT