aiudf president mp badruddin ajmal says hindus should follow muslim formula of getting girls married at 18-20 years  
देश

Video : हिंदू लोक लग्नाआधी ३-४ बायका ठेवतात अन्…; खासदाराचं मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. या वेळी त्यांनी लहान वयात मुलींचे लग्न लावून देण्याचे समर्थन केले. त्यांनी हिंदूंनी त्यांच्या मुलींचे लग्न 18-20 वर्षात केले पाहिजे आणि त्यांनी मुस्लिम फॉर्म्युला पाळला पाहिजे, असा सल्ला देखील यावेळी दिली आहे.

यावेळी बद्रुद्दीन अजमल म्हणाले की, “मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यास तिच्या लग्नाला सरकारने परवानगी दिली आहे. ते (हिंदू) लोक 40 वर्षाआधी दोन-तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. त्यांना मुलं होऊ देत नाहीत. आपला खर्च वाचवतात. मजा करतात. 40 वर्षानंतर आई-वडिलांनी लग्नासाठी प्रवृत्त केलं किंवा ते कुठे अडकले तर ते लग्न करतात.”

“पण 40 वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे राहते? मग कसं अपेक्षा ठेवता की मुलं वाढतील. योग्य वयात लग्न झाल्यास सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात. त्यामुळे त्यांनीही मुस्लिमांचा हा फॉर्म्युला स्विकारायला हवं. आपल्या मुलाचं लग्न 20 ते 22 वर्षात आणि मुलीचं लग्न 18 ते 20 वर्षात करावं, मग बघा तुमच्यातही किती मुलं जन्म येतात” असं विधान बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटलं आहे.

आसाममधील करीमगंज येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेले AIUDF अध्यक्ष आणि खासदार बदरुद्दीन अजमल म्हणाले की, कर्नाटक वक्फ बोर्डाने मुस्लिम मुलींसाठी 10 महाविद्यालये उघडणार असल्याचे सांगितले आहे. मी त्यांना आवाहन करेन की त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयांमध्ये हिंदू मुलींना प्रवेश द्यावा. आम्हाला सर्व मुलींना शिक्षण द्यायचे आहे.

हिंदूंनी मुस्लिमांकडून शिकण्याची गरज नाही

एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांच्या हिंदू महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. आसामचे भाजप आमदार डी कलिता म्हणाले की, तुम्ही मुस्लिम आहात आणि आम्ही हिंदू आहोत. आम्हाला तुमच्याकडून शिकायचे आहे का? ही भगवान राम आणि देवी सीता यांची भूमी आहे. येथे बांगलादेशींना स्थान नाही. आम्हाला मुस्लिमांकडून शिकण्याची गरज नाही.

ते पुढे म्हणाले की, असे बोलून तुम्ही तुमच्या माता-बहिणींना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करत आहात. मी याचा निषेध करतो आणि तुम्हाला हे करू नका असा इशारा देतो आणि तुम्हाला हे करायचे असेल तर बांगलादेशात जा आणि हे करा. हिंदू हे मान्य करणार नाहीत. राजकारणासाठी इतके खाली जाऊ नका आई-बहिणींच्या प्रतिष्ठेवर घाला घालू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT