Ajit Doval Birthday 
देश

Ajit Doval Birthday: भारताचे 'जेम्स बाँड'! पाकिस्तानमधला थरारक किस्सा, डोवाल यांच्याबाबत जाणून घ्या खास गोष्टी

Ajit Doval Birthday: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आज जन्मदिवस आहे. २० जानेवारी १९४५ रोजी जन्मलेले डोवाल आज ७९ वर्षांचे झाले आहेत. भारताचे 'जेम्स बाँड' म्हणून त्यांची ओळख आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आज जन्मदिवस आहे. २० जानेवारी १९४५ रोजी जन्मलेले डोवाल आज ७९ वर्षांचे झाले आहेत. भारताचे 'जेम्स बाँड' म्हणून त्यांची ओळख आहे. गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशी अजित डोवाल यांची प्रदीर्घ कारकीर्द अनेक आव्हानांनी भरलेली होती. चित्रपट कथेला साजेशे असे त्यांचे आयुष्य राहिलेलं आहे. डोवाल यांच्या विषयीच्या काही ठळक गोष्टी आपण जाणून घेऊया (Ajit Doval Birthday Interesting Things To Know About Indian Spy National Security Advisor nsa)

अजित डोवाल यांनी अनेक गुप्त आणि धाडसी मिशन्स पार पाडले आहेत. देशावरील प्रेमापोटी त्यांनी थरारक मिशन यशस्वी करुन दाखवले आहेत. अशा अजित डोवाल यांचा जन्म देवभूमी उत्तराखंडच्या पौरी गढवाल येथे झाला. सुरुवातीचे त्यांचे शिक्षण राजस्थानमधील अजमेर मिलिट्री स्कूलमध्ये झाले. १९६७ मध्ये त्यांनी आग्रा युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रातून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी भारतीय सेवेत जाण्याचा निर्णय घेत आयपीएस ते भारतीय गुप्तहेर अशी कारकीर्द घडवली.

अजित डोवाल यांच्याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी

-अजित डोवाल १९६८ मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजु झाले. त्यांचे वडील देखील लष्करात अधिकारी होते.

- त्यांना गुप्तहेर म्हणून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं होतं. सात वर्षे पाकिस्तानमध्ये राहून त्यांनी गुप्त माहिती गोळा केली

- भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी ईशान्य भारत आणि पंजाबमधील असामाजिक तत्वांविरोधात लढा सुरु केला

- मिझोरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना प्रतिष्ठित असे किर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथमच एका पोलीस अधिकाऱ्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. सर्वसाधारणपणे लष्करातील अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

- गुप्तचर विभागात Intelligence Bureau (IB) काम करत असताना देखील त्यांनी विविध कामगिरी पार पाडल्या. २००४ मध्ये त्यांची आयबीच्या संचालकपदी नेमणूक झाली. २००९ मध्ये ते निवृत्त झाले.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००४ मध्ये डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. त्यामुळे भारतासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात ते केंद्रस्थानी आले.

- डोवाल यांच्या कार्यकाळात २०१६ मध्ये भारताने नियंत्रण रेषेच्या पल्याड सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला. तसेच २०१९ मध्ये बालाकोटमध्ये धाडसी एअरस्ट्राईक घडवला. यामुळे पाकिस्तान आणि इतर भारतीय शत्रूंना योग्य तो संदेश पोहोचला.

- इराणमधील भारतीय नर्सेची सुटका, तसेच पाकिस्तानमधील भारतीय मच्छीमांराची सुटका यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

- अजित डोवाल यांनी कायमच पडद्यामागे राहणं पसंद केलं. मात्र, त्यांचे कार्यच इतके मोठे ठरले ही लोक त्यांना ओळखू लागले. देशप्रेम, धाडस, समर्पण धोरणात्मक हुशारी याचे ते मूर्तीमंत उदाहरहण आहेत

पाकिस्तानमध्ये थोडक्यात बचावले

पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत असताना थोडक्यात बचावल्याचा डोवाल यांनी एक किस्सा सांगितला होता. ते मुस्लीम नसल्याचं एकाने ओळखलं होतं. डोवाल यांच्या कानाला छिद्र होते हे त्या व्यक्तीला कळालं होतं. मुस्लिमांमध्ये कानाला छिद्र करत नाहीत. त्या व्यक्तीने डोवाल यांना दुसऱ्या एका खोलीमध्ये नेलं. डोवाल यांना आता आपण सापडलो असं वाटलं. मात्र, त्या व्यक्तीने सांगितलं की मी देखील एक हिंदूच आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT