ajit dowal. e sakal
देश

Ajit Dowal : "युक्रेनमध्ये शांती गरजेची पण रशिया देखील.." अजित डोवाल यांचा सौदी मधून महत्वाचा संदेश..

Ajit Dowal : रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धाविषयीचा शांततेचा फॉर्म्युला तयार करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

Ajit Dowal : सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 40 देशांतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक नुकतीच पार पडली. भारताकडून अजित डोवाल बैठकीला उपस्थित होते. यावेळी डोवाल यांच्या नेतृत्वाखाली रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाविषयीचा शांततेचा फॉर्म्युला तयार करण्यात आला.

या बैठकीमध्ये बोलत असतांना अजित डोवाल यांनी जगाला सांगितले कि, युक्रेनमध्ये शांतता आवश्यक आहे. मात्र रशियाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. युक्रेनसाठी जो काही प्रस्ताव ठेवला आहे. त्यात रशियाचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतासाठी रशियाशी मैत्री युद्धापूर्वी महत्वाची होती आणि आजही तितकीच महत्वाची आहे.

युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय रशियाच्या विचारांशी जुळणारा आणि सर्वांना मान्य असावा असे डोवाल यांनी स्पष्ट केले. शांतता तोडग्यासाठी रशियाचाही समावेश केला पाहिजे असे डोवाल म्हणाले.

'इथे अनेक शांततेचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रस्तावात काहीतरी सकारात्मक आहे, परंतु दोन्ही बाजूंनी ( रशिया- युक्रेन) हे शांतता प्रस्ताव स्वीकारले नाहीत. अशा स्थितीत या बैठकीत सर्वांना मान्य असलेला तोडगा निघेल का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

डोवाल यांनी बैठकीत सांगितले की, युद्धाच्या सुरुवातीपासूनच भारत नियमितपणे रशिया आणि युक्रेनशी चर्चा करत आहे. भारत संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे समर्थन करतो. त्याच वेळी, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर सर्व देशांनी राखला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Mumbai Morcha: गर्जना मोर्चात 'डुप्लिकेट ज्ञानेश कुमार', मनसैनिकांनी थेट दोरीनेच बांधलं; Video Viral

रश्मिकाचं सासूसोबत कसं आहे नातं? विजय दोघींबद्दल बोलताना म्हणाला, 'त्या नेहमीच...'

शहीद जवानाचे पार्थिव नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, मुलासह चौघांचा मृत्यू; एक्सप्रेसवेवर मृत्यूचं तांडव

धोनीपासून सुरू झालेली तीच परंपरा, आता शुभमन गिलनेही जपली! ट्रॉफी स्वतःकडे न ठेवता आकिब नबीच्या हातात दिली अन् VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT